खादी शर्टमधील अत्याधुनिक शेतकी सामग्रीचा किरकोळ विक्रेता त्याच्या दुकानात स्मार्टफोनसह उभा आहे. तो समाधानी दिसतोय.

भारतातील सर्वात मोठ्ठ्या कृषी समुदायाशी जुडा आणि आपला व्यवसाय डिजिटली वाढवा.मोफत ऑनलाईन दुकान मिळवा

भारतातील 3 लाख सक्रिय प्लँटिक्स शेतकऱ्यांशी जुडा.

अधिक सूट मिळवण्यासाठी प्रत्येक ऑर्डरवर लॉयल्टी पॉइंटस मिळवा.

सुलभ व्यवस्थापनासाठी तुमच्या व्यवसायांचे डिजिटल रुपांतर करा.प्लँटिक्स पार्टनर दुकान ऑफर्स

  • होस्टिंग शुल्क किंवा दलालीशिवाय मोफत ऑनलाईन दुकान.
  • सुलभ सेटअपसाठी दुकान समर्थनासह तपशीलवार उत्पादन वर्णन, छायाचित् आणि अनुप्रयोग सल्ला.
  • फोन आणि पीसीसाठी अनुकूलित केलेले व्यावसायिक डिझाईन
  • डिजिटल पेमेंट प्रक्रियेसह कार्यवाही आणि व्यवस्थापनातील साधेपणा.

प्लँटिक्स पार्टनर दुकान बद्दल अधिक जाणुन घ्या

प्लँटिक्स पार्टनर दुकान बद्दल

प्लँटिक्स पार्टनर दुकान हा एक मोफत डिजिटल मंच आहे. हा स्वतंत्र कृषी किरकोळ विक्रेत्यांसाठी बनविला गेला आहे, ज्यांना त्यांच्या व्यवसायात डिजिटली वृद्धिंगत व्हायचे आहे आणि त्यांच्या समुदायत तसेच भारतभर ऑनलाईन अस्तित्व दर्शवायचे आहे.

मोफत ऑनलाईन दुकान मिळवा

आमची कथा

गेल्या पाच वर्षांमध्ये, प्लँटिक्सने स्वतःला डिजिटल वनस्पती रोग निदान आणि लागवड तज्ञ म्हणून स्थापित केले आहे. आज, आम्हाला कृषी-किरकोळ विक्रेत्यांना शेतकऱ्यांशी जोडायचे आहे आणि त्यांना डिजिटल व्यवसाय परिवर्तनाद्वारे वृद्धिंगत होण्यास तसेच चांगल्या सेवा पुरविण्यात मदत करायची आहे.

आमचे ध्येय

एकाच डिजिटल इकोसिस्टममध्ये लहान-मोठ्या शेतकरी आणि पुरवठादारांना सानुकूलित उपाय, विश्वासार्ह उत्पादने आणि विश्वासार्ह सेवांशी जोडले जाईल.

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्लँटिक्स पार्टनर दुकान काय आहे?

स्वतंत्र किरकोळ दुकानदारांना त्यांचा साठा दर्शविण्यासाठी पूर्ण सेवा देणारे प्लँटिक्स पार्टनर दुकान हे ऑनलाईन दुकान आहे. आधीच भरलेल्या विभागांसह आपले स्वत:चे दुकान सेटअप करणे अत्यंत सोपे आहे. प्लँटिक्स १००० हून अधिक उत्पादनांचा कॅटलॉग पुरवितात ज्यातुन किरकोळ दुकानदार ते देऊ करीत असलेले उत्पाद निवडु शकतात.

आमच्यासाठी ग्राहक संतुष्टी हे अति महत्वाचे आहे! म्हणुन,आमच्या कॅटलॉगमध्ये आम्ही वर्णने, वापर आणि उत्पादन माहिती तपशीलात दिलेली आहे. शेतकर्‍यांना त्यांच्या समस्येसाठी योग्य उत्पादन निवडण्यासाठी लागणारी सर्व माहिती आम्ही सूचीबद्ध करतो. ऑनलाईन दुकान ऑर्डर व्यवस्थापन टूलही पुरविते ज्याद्वारे आपणांस शेतकरी स्वत: येऊन घेऊन जाणार्‍या ऑर्डरी आणि आपण स्वत: समन्वय करीत असलेल्या ऑर्डरींचे व्यवस्थापन करता येते. ह्यात ऑनलाईन पेमेंटचीही सोपी आणि सुरक्षित प्रणाली सम्मिलित केलेली आहे.

प्लँटिक्स पार्टनर दुकानाचे प्रमुख फायदे काय आहेत?

  • शेतकर्‍यांच्या ऑर्डरी अधिक मिळविण्यासाठी भारतातील सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा.
  • आपली ऑनलाईन व्यवसाय उपस्थिती निर्माण करा आणि ऑनलाईन व्यावसायिकपणा तसेच सर्वोत्तम सेवेसह स्पर्धेत आघाडी मिळवा.
  • उत्पादन माहिती तपशीलात मिळवा आणि आपल्या समुदायातील शेतकऱ्यांना चांगली सेवा देऊ करा.
  • सर्वोत्तम किंमती आणि नविन उत्पादने दर्शवुन आपल्याकडील शेतकरी ऑर्डर वाढवा.
  • प्रत्येक ऑर्डरवर लॉयल्टी पॉईंट मिळवा. आपण आपल्या पुढील खरेदीवर मोठ्या सवलतीसाठी प्लॅंटिक्स पार्टनर अॅपसह आपले लॉयल्टी पॉईंटस रिडीम करू शकता.

प्लँटिक्स पार्टनर दुकान मोफत आहे का?

होय, प्लँटिक्स पार्टनर दुकान पूर्णपणे मोफत आहे! ही एक मोफत होस्टिंग आणि कमिशनमुक्त मोफत वेबसाईट आहे. कृषी किरकोळ दुकानदारांना आणि शेतकर्‍यांना समृद्ध होण्यास मदत करण्यास प्लँटिक्स सदैव बांधील आहेत. आम्हाला कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवुन आणायचा आहे ज्यामुळे शेतकर्‍यांची उपजिविकाही वाढेल आणि पुढच्या पिढ्यांनाही उपजिविका मिळण्यात मदत होईल.

माझे मोफत ऑनलाईन दुकान सेट अप करण्यासाठी मला काय करावे लागेल?

"मोफत ऑनलाईन दुकान मिळवा" बटनावर क्लिक करा आणि आपले तपशील भरा म्हणजे आम्ही आपले ऑनलाईन दुकान सेटअप करणे सुरु करु.

दुकान सेट अप करण्यासाठी किती वेळ लागतो?

आपणांस २४ तासात आपली प्री-पॉप्युलेटेड ऑनलाईन दुकानाची लिंक मिळेल.

मी तांत्रिक सहाय्य कसे मिळवू शकतो?

मी माझे प्लँटिक्स पार्टनर दुकान कसे रद्द करु शकतो?

आम्हाला वर सूचीबद्ध केलेल्या क्रमांकांवर कॉल करा किंवा आम्हाला partner-dukaan@plantix.net वर मेल पाठवा आणि आम्ही तुमचे खाते लगेच रद्द करु

पार्टनर दुकानामुळे ऑनलाईन व्यवसाय करणे अत्यंत सोपे जाते.